वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय गजानन बुवाला अखेर अटक

 वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे



कल्याण (ठाणे) : वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. याच मागणीमुळे पोलिसांवरील सामाजिक दबाव वाढला होता. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post