आदिवासी भिल्ल समाजातील आजीसाठी महत्वाची मिटींग सोडून धावले खा.डॉ.विखे, करोनातून मुक्त झाल्यावर वृद्धा म्हणाली....

 *वय 70, सिटी स्कोर 23, ऑक्सिजन केवळ 50 , बऱ्या होऊन आजी म्हणतात पोरा असंच काम करीत राहा आणि स्वतः ची काळजी घे* 

 *डॉ विखे पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय आजीची कोररोनावर मात*  *(नगर, दि 07)* देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गचे प्रमाण पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत करोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी म्हणजे डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये आली आहे,  गंगुबाई बर्डे , 70 वर्षीय रा, वरवडे, तालुका राहुरी येथील आजींनी 14 दिवस कोरोना शी झुंज देऊन कोरोना वर यशस्वी मात केली. मागील काही दिवसांपासून 

कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ , व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बॅड  ची कमतरता जाणवत आहे.  अशातच  मुळा धरणाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाच्या  गंगुबाई बर्डे  ह्यांना कोरोना ने गाठले. यांचा मुलगा अंकुश  बर्डे  ह्याने वेळेत चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईसाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड ची उपलब्धता व्हावी यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु सगळीकडे नकार घंटा मिळाल्याने त्याने सरळ खासदार डॉ सुजय विखे ह्यांना गाठले.  आईची ऑक्सिजन पातळी 48 ते 50 पर्यंत खालावली होती, एच आर सिटी स्कोर  22 होता अशातच घाबरलेल्या मुलाने  आईच्या खालावलेल्या तब्येती बद्दल खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना सांगितली.    मिटिंग सोडून खासदारांनी रुग्णांकडे धाव घेतली, त्यांना आधार देत त्यांना  व्हेंटिलेटर बेड   विलाद घाट येथे डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिला त्यांना मानसिक आधार दिला.   आज दि, 7 रोजी कोरोनावर  यशस्वी उपचार करून  मात करणाऱ्या वयोवृध्द आजीने आठवण झाली त्या पोराची आणि  चांगल्या उपचारांबद्दल  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना आत्मियतेने जवळ घेवून   गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा असा आशीर्वाद दिला.

आई कोरोना संक्रमित असल्याचे समजले मी खूप घाबरलो होतो एच आर सिटी स्कोर 22 व  ऑक्सिजन लेवल 48 होती अशा हतबल अवस्थेमध्ये मी विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट येथे गेलो तिथे जाऊन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना आईबद्दल सांगितले त्यांना माहिती मिळताच मीटिंग सोडून माझ्या आईला बघण्यासाठी आले त्यांनी तिला मानसिक आधार दिला व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली यामुळेच आज माझी आई कोरोनावर यशस्वी मात करू शकली त्याबद्दल मी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो - 

श्री अंकुश बर्डे,मुलगा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post