'एसीबी'च्या अधिकार्यावरच लाच प्रकरणी कारवाई

 

'एसीबी'च्या अधिकार्यावरच लाच प्रकरणी कारवाईबीड: लाच घेताना पकडलेल्या शाखा अभियंत्यास गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याच  सहायक निरीक्षकासह अंमलदाराने लाच मागितल्याचा प्रकार सोमवारी (ता. १४) समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक बीडमध्ये दाखल झाले.

गेवराई तालुक्यातील एका गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी पंचायत समितीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता शेख समद नूर मोहम्मद यास एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एप्रिल महिन्यात ही कारवाई केली. याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक राजकुमार पाडवीकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी याने चिठ्ठीवर दोन लाख रुपयांचा आकडा लिहून लाच मागितली तर त्याचा लेखणिक अंमलदार प्रदीप वीर याने ५० हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार शेख समद नूर यांचे बंधू जमीलोद्दीन शेख यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांसह औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्याकडे केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post