रक्तदान व अन्नदान करून वडिलांच्या स्मृतीस उजाळा

 रक्तदान व अन्नदान करून  वडिलांच्या स्मृतीस उजाळा

सांकला परिवाराचा अभिनव उपक्रम 
 नौपतलालजी सांकला यांचा प्रथम स्मृति दिन 


पुणे : आयुष्यभर ज्या व्यक्तीने प्रत्येकाला मदत केली, त्यांच्याकडे मदतीसाठी येणारा कधी मोकळ्या हाताने गेला नाही, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दाखवले, असे उद्योगपती व गणेशभक्त. सच्चीयायी  माता भक्त,   स्व. नौपतलालजी सांकला यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी रक्तदान, अन्नदान व इतर सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याचा अभिनव उपक्रम केला आहे.
        नौपतलालजी सांकला यांची दोन्ही मुले उद्योगपती राजेश सांकला आणि उद्योगपती रवींद्र सांकला यांनी 7 जून रोजी महावीर प्रतिष्ठान येथे सकाळी साडेनऊ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सर्व कायदा पाळून फक्त 50 लोकांचीच  व्यवस्था करणार  अशी माहितीही  सगळ्याना देवून  ऑनलाइन   अर्ज मागवून  सुद्धा शिबिरामध्ये रक्तदाते आले. सुमारे 80 नागरिकांनी रक्तदान केले.यासाठी सिद्धी फाउंडेशनचे मनोज छाजेड ,नरेंद्र बलदोटा,  सिद्धांत छाजेड, सिद्धि छाजेड ,अमित संघवी , ऋषभ सांकला, अभिनंदन सांकला ,  यांनी सहकार्य केले. तसेच स्व. नौपतलालजी सांकला यांच्या पत्नी प्रमिला सांकला, मुलगी हेमा गादिया, सून रंजना सांकला, लतिका सांकला  आणि सांकला परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून निर्जरा संस्थेच्या माध्यमातून 7 जून रोजी माहेर संस्था मांजरी येथे 1100 लोकांना जेवण तसेच चिखली येथील अंध व अपंग लोकासाठीच्या गुरुकुल येथे 300 लोकांना जेवण .यावेळी जैन समाजातील अनेक व्यक्तीनी महावीर प्रतिष्ठान येथे भेट देऊन    नौपतलालजी सांकला यांच्या आठवणीला उजाळा दिला.
       ज्या व्यक्तीने आयुष्यभर इतरांना मदतीचा हात दिलेला आहे, त्या व्यक्तीच्या पश्चात अशा सामाजिक उपक्रमातून त्यांच्या आठवणीला दिलेला उजाळा यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असावी. सांकला बंधूंकडून वडिलांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांची स्तुती होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post