मनपा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल

  मनपा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल -  मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

मनपाच्या माध्यमातून श्रमिकनगर येथे आरोग्य केंद्राचे भूमिपूजननगर- राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला होता महापालिकेतील भाजपने अडीच वर्षाच्या कार्यकाळात भरघोस असे चांगले काम केले आहे.कोविड संकट काळातही महापालिकेचे काम कौतुकास्पद आहे, पुढील अडीच वर्षानंतर मनपा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल. श्रमिकनगर मध्ये उभारण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्र मुळे सावेडी उपनगरातील गोरगरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाणार आहे. नगरसेवक मनोज दुल्हम हे खरे कोरोना योद्धे आहे कोविड संकट काळात रात्रंदिवस त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केली अनेक रुग्णांच्या जवळ नातेवाईक जात नसताना त्या रुग्णांना आधार देण्याचे काम त्यांनी केले, कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीचे मोठे काम त्यांनी केले.सामाजिक कामाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडले असे प्रतिपादन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

       मनपाच्या माध्यमातून श्रमिकनगर येथे साकारण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर,मा. सभागृहनेते मनोज दुल्हम, नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेविका सोनाबाई शिंदे,नगरसेवक मनोज कोतकर,तायगा शिंदे,अजय चितळे,गणेश नन्नवरे,विलास ताठे,उदय कराळे,संजय ढोणे,सतिष शिदे,विनोद म्याना,विलास संगम,शंकर येमुल,अंबादास चिट्याल, शिवराम श्रीगादी,अरुण ताटी,मनोज जटला,गणेश रंगारे,कृष्णा येनगुल आदी उपस्थित होते.
       यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की,कोरोनाच्या काळा मुळे मानवी आरोग्य किती महत्वाचे आहे हे समजले आहे.त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सावेडी येथील श्रमिकनगर येथे आरोग्यकेंद्र  उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा मिळणार आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन महापालिकेचा कारभार केला आहे. रखडलेल्या प्रलंबित प्रश्नांवर बरोबरच विकासाचे प्रश्न मार्गी लावले तसेच रेंगाळलेल्या फेज टू पाणी योजनेला गती दिली, अमृत पाणी योजनेला गती देण्यात आली लवकरच ही योजना पूर्ण होऊन नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे, भुयारी गटार योजनेच्या कामाला गती दिली आहे असे ते म्हणाले.
           यावेळी बोलताना महिंद्रा भैया गांधी म्हणाले की,सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीम नेमणूक करणार आहे प्रभाग पाचमधील चारही नगरसेवकांनी या कामासाठी पाठपुरवठा केला असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post