लस घेतली आणि चक्क पॅरालिसीस बरा झाला...

 

लस घेतली आणि चक्क पॅरालिसीस बरा झाला...भोपाळ: करोनाची लस घेतल्यावर अंगाला चमचे, वाट्या चिकटत असल्याचे आढळले होते. आता एका व्यक्तीने लस घेतल्याच्या तासाभरातच पॅरालिसीस ठीक झाल्याचा दावा केल्याने डॉक्टरही अचंबित झाले आहेत. 

मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचे रहिवासी अब्दुल मजीद खान यांनी सकाळी १०.३० वाजता कोरोना लस घेतली. गेल्या सहा-सात महिन्य़ांपासून त्यांना पॅरालिसीस झाला होता. चेहऱ्यावरही परिणाम झाल्याने ते नीट बोलू शकत नव्हते. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना फरक जाणवायला लागला. लस घेतल्यानंतर काही वेळातच त्यांचे लकवा मारलेले अवयव हलविता येऊ लागले. जे अवयव सुन्न झाले होते, ते हालचाल करू लागले. यामुळे खान हे आता कोरोना लसीला वरदान म्हणू लागले आहेत. अनेक डॉक्टरांनी यावर उपचार केले होते. जो जिथला डॉक्टर चांगला तिथे ते जात होते. आता लस घेतल्याने लकवा बरा झाल्याने ते आता लोकांना कोरोना लस घेण्याचे सांगत आहेत. खान यांनी कोविशिल्ड लसीचा डोस घेतला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post