महापौरपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

 


महापौरपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षनगर : नगरच्या नूतन महापौरपदाची निवड चालू महिन्यात होणार असून महापौरपदासाठी राजकीय जोरबैठका सुरु झाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने नगर शहरातही शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस एकत्र येवून मनपातील सत्ता ताब्यात घेतील असे सरळ गणित सांगितले जात आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सेनेचा महापौर होईल असे चित्र असले तरी नगरचा राजकीय इतिहास पाहता अन्य शक्यतांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मागील वेळी शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने कमी संख्या बळ असलेल्या भाजपला महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांची भेट दिली होती. त्यावेळी भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे किंगमेकर ठरले होते.

आता नव्याने महापौर निवडीवेळीही कर्डिले यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेत एका पदाधिकार्‍याच्या पदग्रहण कार्यक्रमावेळी कर्डिले यांनी, पुढील अडीच वर्षेही  भाजप महानगरपालिकेत सत्तेत भागीदार राहिल असं वक्तव्य केले होते. सध्या या वक्तव्याची आठवण करून देत अनेक जण भाजप ऐनवेळी मोठी खेळी करेल असा अंदाज बांधला जात आहे. राष्ट्रवादीकडे महापौरपदासाठीचे उमेदवार असून मागील वेळी केलेल्या मदतीची परतफेड करून भाजप सेनेला रोखण्याचा प्रयत्न करेल असेही सांगितले जात आहे. अर्थात या सर्व शक्यतांमध्ये माजी मंत्री कर्डिले यांचीच भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post