लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील पोस्टल इन्व्हलपचे प्रकाशन

 लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील पोस्टल इन्व्हलपचे प्रकाशनपरळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून त्याचे विमोचन आज गोपीनाथगड येथे केले.  नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत विमोचन झाले. कार्यक्रमात ऑनलाईन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  , विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत बावनकुळे , गोपीनाथ गड वर माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. भागवत कराड, आ.मोनिका राजळे, आ.सुरेश धस आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post