लस घेतल्यावर शरीरात चुंबकत्व...डॉ.‌तात्याराव लहाने म्हणाले...

लस घेतल्यावर शरीरात चुंबकत्व.... डॉ.‌लहाने यांचा खुलासा मुंबई: नाशिकमध्ये असा प्रकार समोर आला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तु चिकटत  असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने  यांनी सोशल मीडियावर सुरु असलेली ही चर्चा खोडून काढली आहे.

"लस घेतल्यानंतर शरीरात लोहचुंबकत्व निर्माण होत नाही. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, त्यात २ टक्के लोकांवर साईड इफेक्ट होतात. शरीरात चुंबकत्व निर्माण होतं हे एक टक्के लोकांच्या बाबतीत पकडलं तर, लाखो लोकांच्या बाबतीत असं झालं पाहिजे. फक्त एकाच माणसाला असं होत असेल, तर ते लसीमुळे नक्कीच झालेलं नाहीय" असे तात्याराव लहाने यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post