बाजार समितीच्या वतीने शेतकर्यासाठी कृषी विषयक ऑनलाईन मार्गदर्शन

 

बाजार समितीच्या वतीने शेतकर्यांना कृषी विषयक ऑनलाईन मार्गदर्शनपारनेर  -  पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती,  यांच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी एक नविन उपक्रम म्हणून ऑनलाईन शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. सध्याच्या करोना परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आयोजनावर बंधने असल्यामुळे याऑनलाईन उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सभापती गायकवाड यांनी दिली.

येत्या 10 जूनपासून सकाळी 10 वाजता या उपक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक महिन्याला 2 वेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन होणार आहे. यामध्ये कांदा, डाळी, कडधान्य, डाळिंब, खरीप तयारी, पशुवैद्यकीय, कृषी विषयक छोटे व्यवसाय आणि प्रकल्प, विकास सोसायट्यांचे नवीन कायदे- नियम, कर्ज माफी, शेती विषयक शासकीय योजना, पीक विमा, आधुनिक शेती व यांसारखे इतर विषय घेऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे.

तसेच या ऑनलाईन उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मेडिटेशन यावर देखील चर्चासत्र घेणार आहेत. या चर्चासत्रांमध्ये विविध कृषीतज्ञ व प्रगतिशील शेतकरी यांचा सहभाग असणार आहे. चर्चासत्रातील विषयांशी निगडित शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्‍न व शंका यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. हे चर्चासत्र झूमअ‍ॅपवर होणार आहेत व त्याच्या लिंक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याची माहिती सभापती गायकवाड, उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post