महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात\ मुंबई - महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका आणि बॉलिवूडची सिंगर वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने घड्याळ हाती घेतलं. त्यामुळे, आता वैशालीचा राजकारणात सूर लागणार आहे. तिच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वैशालीचं स्वागत केलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंनीही ट्विट करुन तिचं स्वागत केलं आहे. 


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, आज वैशालीने अधिकृतपणे राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्विकारले आहे. यावेळी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post