खा.विखे मनपाच्या राजकारणात सक्रिय, महापौरपदाबाबत नगरसेवकांशी चर्चा

खा.विखे मनपाच्या राजकारणात सक्रिय, महापौरपदाबाबत नगरसेवकांशी चर्चानगर : महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली विळदघाट येथे शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीस शहरातील भाजप नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला विखे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाकडे महापौर पदासाठी उमेदवार नाही. तसेच सत्ता स्थापनेसाठी पुरसे संख्याबळ नाही. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने महापालिकेत भाजपची सत्ता आली. सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला महापौर व उपमहापौर पद मिळाले; परंतु यापुढे कुणाच्याही मागे फरपटत न जाता तटस्थ राहावे, अशी भावना पदाधिकाऱ्यांची व्यक्त केली. त्यानंतर नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पक्ष जो आदेश देईल, तो सर्वांना मान्य राहील. पक्षाने महापौर निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले असल्याचे समजते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post