नवीन बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ टक्के

 दिनांक ८ जून, २०२१

आज ११३४ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ५३४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ टक्केअहमदनगर: जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत  ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ४४० इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४० आणि अँटीजेन चाचणीत २६९ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले ०९, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पाथर्डी ०१, संगमनेर ०९ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०२, जामखेड ०२, कर्जत १०, कोपरगाव ०४, नगर ग्रा.०६,  नेवासा ३४,  पारनेर २९, पाथर्डी २८, राहाता ०८,  राहुरी १८, संगमनेर १८, शेवगाव ३०, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज २६९ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, अकोले १७,  जामखेड १४, कर्जत २७, कोपरगाव १९, नगर ग्रा. २०, नेवासा २२, पारनेर १६, पाथर्डी १७,  राहाता १२, राहुरी १०, संगमनेर ३१, शेवगाव २५, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ३६, अकोले ७७, जामखेड ६१, कर्जत ३८,  कोपरगाव २०, नगर ग्रामीण ६६, नेवासा १३७, पारनेर ८६, पाथर्डी ५०, राहाता ६६, राहुरी ५१, संगमनेर १५२,  शेवगाव ८९,  श्रीगोंदा ११८,  श्रीरामपूर ७०, कॅन्टोन्मेंट ०५, इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:२,६०,०९२


उपचार सुरू असलेले रूग्ण:५४४०


मृत्यू:३५३१


एकूण रूग्ण संख्या:२,६९,०६३


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post