दीड वर्षांच्या दिव्यांग मुलीचा खून, आजोबा व काकू अटकेत

दीड वर्षांच्या दिव्यांग मुलीचा खून, आजोबा व काकू अटकेत पंढरपूर : घरासमोर खेळत असताना बेपत्ता झालेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. दिव्यांग मुलीचा आजोबा आणि काकीनेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी आजोबा आणि चुलतीला पोलिसांनी अटक केली आहे. हलदहिवडी येथील अमोल फाळके यांची जान्हवी नावाची दीड वर्षांची दिव्यांग मुलगी 6 जून रोजी बेपत्ता झाली होती. घराच्या अंगणात खेळत असताना सकाळी 8 वाजताच ती अचानक गायब झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी जान्हवीचा मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसून आला होता. पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही दिवसात आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये जान्हवीच्या सख्ख्या आजोबांनी आपल्या दुसऱ्या सुनेच्या मदतीने कोवळ्या नातीचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. परंतु हा खून कोणत्या कारणासाठी केला हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post