आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई पास' संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

 आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास संदर्भात सरकारचा मोठा निर्णयमुंबई :  येत्या सोमवारपासून (7 जून)  तुम्हाला जर गावी जायचं असेल तर विना ई-पास (E-Pass) जाणं सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणं अनिवार्य करण्यात आलंय. पण दिलाशाची बाब अशी की, सध्या राज्यातील कुठलंही शहर किंवा जिल्ह्याचा पाचव्या गटात समावेश नाही. त्यामुळे आतातरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post