धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या...

चांदा परिसरात धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या... नेवासा -  तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास एका युवकांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय ४०) हे नदीजवळ चौकात थांबले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. हल्लेखोर तेथुन पसार झाले. दवाखान्यात जाईपर्यंत दहातोंडे हे मयत झाले होते. श्रीरामपूर विभागीय पोलिस निरीक्षक दिपाली काळे शेवगाव विभागीय पोलिस निरीक्षक सुदर्शन मुंढे, सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे घटनास्थळी हजर झाले आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अजुन समजु शकल नाही.  या प्रकाराने चांदा परिसरात खळबळ उडाली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post