पुण्यातील कंपनीने बनवला ३ डी मास्क, करोनाला ९५ टक्के अटकाव

 

पुण्यातील कंपनीने बनवला ३ डी मास्क, करोनाला ९५ टक्के अटकाव होण्याचा दावा पुणे: कोरोना महामारीनंतर आता औषध उत्पादक कंपन्या आणि मास्क निर्माण करणाऱ्या कंपन्या चांगल्यात चांगले मास्क करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. 


पुण्यात असलेल्या एक स्टार्ट अप कंपनीनं 3डी प्रिंटेट मास्क बनवला आहे. थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हा मास्क बनवला असून त्यांनी दावा केला आहे की, हा मास्क एन-95, 3-प्लाय आणि कपड्यापासून बनवलेल्या मास्कच्या तुलनेत अधिक सुरक्षा देऊ शकेल.  

कंपनीच्या मते, मास्कवर केलेल्या विषाणू नाशक कोटिंगमुळं चाचणीत चांगले परिणाम समोर आले आहेत. यामध्ये कोविड 19 (SARS-COV-2) विरोधात चांगली सुरक्षा करण्याची ताकत आहे. मास्कच्या कोटिंगसाठी सोडियम ओलोफिन सल्फोनेट आधारित सामग्रीचा वापर केला आहे. हा मास्क पुनर्वापर करण्याजोगा आहे. या मास्कचा वापर आपण अनेक वेळा करु शकतो. या मास्कचे फिल्टर्स देखील 3-डी प्रिटिंगच्या वापरानं बनवले आहेत. या मास्कची विषाणू विरोधी क्षमता   95 टक्के असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post