खा.सुप्रिया सुळे यांनी केलं आ.लंके यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक

 आ.निलेश लंके यांचे व्यवस्थापन कौशल्य कौतुकास्पद: खा.सुप्रिया सुळेनगर: पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या ११०० बेडच्या भाळवणी येथील मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर येथील रुग्ण, डॉक्टर्स, स्वयंसेवक,कर्मचारी व इतरांशी खा.सुप्रिया सुुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. 

कोविड ऐकले तरी लोक दुर जायचे त्या काळात निलेश लंके यांनी रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला. हे अतिशय उत्तम कार्य असून याची नोंद त्यांच्या मतदारसंघाने घेतलीच यासोबत देशभरातील माध्यमांनी देखील घेतली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते काम करीत आहेत.

व्यवस्थापनातील कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्यांच्याकडे व्यवस्थापनातील कोणतीही डिग्री नाही.पण तरीही त्यांनी उत्तम दर्जाचे व्यवस्थापन केले आहे.ते महाराष्ट्राचे पुत्र आहेत.निलेश लंके,त्यांचे कुटुंब आणि सहकाऱ्यांना खुप खुप शुभेच्छा, अशा शब्दांत खा. सुळे यांनी आ.लंके यांच्या कामाचे कौतुक केले.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post