करोना चाचणीच्या नावाखाली उधळपट्टी, संदेश कार्ले यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

करोना चाचणीच्या नावाखाली उधळपट्टी, संदेश कार्ले यांनी वेधले प्रशासनाचे लक्षनगर : करोना उच्चांकी पातळीवर असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोना चाचणी किटची कमतरता भासत होती. लोकांना चाचणीसाठी दिवसदिवस थांबावे लागत होते. मात्र आता करोनाचा कहर ओसरला असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावरही करोना चाचणी केली जात आहे. अनेक ठिकाणी तर एकाचवेळी नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचणीही केली जात आहे. एकाच व्यक्तीच्या या दोन चाचण्या करण्याचा प्रकार एक प्रकारे उधळपट्टी असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे. एका करोना चाचणीसाठी खूप मोठा खर्च येतो. अशाप्रकारे सरसकट चाचण्या त्याही एकाच जणाच्या दोन चाचण्या करून चाचणी किटचे ‘अर्थकारण’ वाढविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.

नगर तालुक्यातील सारोळाबद्दी येथील लसीकरण केंद्रावर एकाच व्यक्तीची अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत असल्याचे कार्ले यांच्या निदर्शनास आले. किटवर होणारा हा विनाकारण खर्च थांबवावा व आवश्यक असेल तरच योग्य चाचणी करावी अशी मागणी कार्ले यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post