नगर जिल्ह्यात करोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले महत्वाचे आदेश

 कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. भोसले 

            अहमदनगर – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व तालुकास्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिका यांनी त्यादृष्टीने आरोग्य विषयक सुविधांचे बळकटीकरण करावे. तसेच सध्या निर्बंध शिथिल कऱण्यात आलेले असले तरी कोविड सुसंगत वर्तणूक करीत नसलेल्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कारवाई कराअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.

            कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागरनिवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचितउपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोलेउर्मिला पाटीलजयश्री आव्हाडउज्ज्वला गाडेकररोहिणी नऱ्हेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे हे जिल्हास्तरावरुन तर तालुकास्तरावरुन उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारसर्व गटविकास अधिकारीसर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणालेकोरोनाची पहिली लाट जवळपास वर्षभर चालली. मात्रत्यानंतर दुसऱ्या लाटेत अवघ्या अडीच महिन्यात जवळपास दोन लाख रुग्णांची भर पडली. सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. या लाटेत सध्यापेक्षा दुप्पट वेग रुग्णवाढीचा असेलअसे बोलले जात आहे. त्यामुळे या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. जिल्ह्यातील ऑक्सीजनची उपलब्धतारुग्णशय्या (बेडस्) उपलब्धताऔषधे उपलब्धता याबाबतची तयारी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांची असणे आवश्यक आहे.

            सध्या जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सर्व ग्रामीण रुग्णालय येथे उभारले जात आहेत. ते काम आता तातडीने पूर्ण केले जाईलयाबाबत सर्वांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 18 मेट्रीक टन ऑक्सीजन उपलब्ध होईल. याशिवायजिल्ह्यातील ज्या हॉस्पिटलची क्षमता पन्नास बेडस् पेक्षा जास्त आहेत्यांनीही त्यांचे ऑक्सीजन प्रकल्प उभारली केली पाहिजे. तसेचजम्बो सिलींडरड्युरासेल यांचीही उपलब्धता करुन घेतली पाहिजे. संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाहीयासाठी लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले तर सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्ण बरा होऊ शकेल आणि डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालयावरील ताण कमी होऊ शकेल. ऑक्सीजनची गरजही तेवढ्या प्रमाणात कमी होईलअसे डॉ. भोसले यांनी सांगितले.

            जिल्ह्यातील मोठे उद्योजकव्यापारीसंस्थासंघटनास्वयंसेवी संस्था यांनीही ऑक्सीजन कॉन्स्न्ट्रेटर खरेदी करुन ते या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करुन द्यावेतअसे आवाहनही त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post