राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहर विकासाची ब्लू प्रिंट

 राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर विकासाची ब्लू प्रिंट मान्यवरांना भेटमनसेच्या विकास आराखड्यातून शहर विकासात भर पडेल - सुमित वर्मा

     नगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि पर्यायाने संपुर्ण महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन खुप वेगळा आहे. याला फक्त राजकारणाची जोड नाही तर वैचारिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. शहरातील सर्व घटकांचा शहर घडवण्यासाठी मोठं योगदान आहे, या सर्व घटकांपर्यंत आम्ही राजसाहेबांचा विचार पोहचवण्यासाठी प्रयत्न या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून लक्षात येतो. नगर शहरासाठी या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून काही विकासाचे नियोजन करण्यासाठी मदत झाली तर मनसेने केलेल्या मेहनतीचे चीज होईल. यासाठी  शहराच्या विकासात योगदान देत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ब्लू प्रिंटचे वितरण करुन शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केला असल्याचे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.


     महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महत्वाच्या घटकांचा समावेश असलेली  मनसेच्यावतीने  तयार करण्यात आलेली नगर शहर विकास आराखडा - ब्ल्यू प्रिंट जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना भेट देण्यात आली.  यावेळी नगर तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, उपशहर अध्यक्ष स्वप्निल वाघ, आदेश गायकवाड, ओंकार काळे, योगेश गुंड आदी उपस्थित होते.


     ही ब्लू प्रिंट नगरमधील अ‍ॅड.मा.श्री शिवाजी कराळे,  मॅककेअर हॉस्पिटलचे डॉ.सतिश सोनवणे, श्रीकांत बेडेकर, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरा, इंजि. राजेंद्र पाचे आदिंसह मान्यवरांना भेट देण्यात आली आहे, त्यावर या मान्यवरांनी शहर विकासाबाबतचे आपले विचार मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे देखील या ब्लू प्रिंट चे वितरण शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार्‍यांना मान्यवरांना देण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post