माजी सरपंच हत्या प्रकरण दोघे संशयित ताब्यात

 माजी सरपंच हत्या प्रकरण दोघे संशयित ताब्यातखुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या परंतु पॅरोलवर सुटलेल्या नारायणगव्हाचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची तिक्ष्ण हत्याराने निघृण हत्या केली आहे.शुक्रवारी दुपारी माजी सरपंच शेळके त्यांच्या शेतात काम करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला गळ्यावर तीक्ष हत्याराने वार केले.

त्यात त्याच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यास तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.दरम्यान दहा वर्षपूर्वी १३ नोव्हेंबर २०१० रोजी नारायणगव्हाणचे तत्कालीन चेअरमन प्रकाश कांडेकर यांची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

कांडेकर व माजी सरपंच राजाराम शेळके यांच्यात राजकीय वैर होते. यातूनच राजाराम शेळके याने मारेकऱ्यांना सुपारी देऊन कांडेकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.यात शेळके शिक्ष भोगत होता. मात्र कोरोनामुळे तो पॅरेलवर आला होता.  दरम्यान राजेश भानुदास शेळके, संग्राम प्रकाश कांडेकर, गणेश भानुदास शेळके,सुर्यभान भानुदास कांडेकर,

भुषण प्रकाश कांडेकर,अनिकेत प्रकाश कांडेकर,सौरभ सुर्यभान कांडेकर,अक्षय पोपट कांडेकर यांच विरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post