जैन साधूसाध्वींनी केले आ.संग्राम जगताप यांच्या कामाचे कौतुक

 आनंदधाम येथील साधु-साध्वीनां प्रतिबंधक लसीकरण देण्यास सुरुवात


कोरोना संकट काळात आ.संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान-कुंदन ऋषीजी म.सा.नगर- गेल्या दीड वर्षापासून मानवी जीवनावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट ओढवले आहे.यासंकटावर मात करण्यासाठी कोरोना रोगप्रतिबंधक लसीकरणायाची खरी गरज आहे आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संकट काळामध्ये आपली जबाबदारी सक्षम पणे पार पडली,नागरिकांसाठी अहोरात्र झटले कोरोणाच्या अतिसंवेदनशील रुग्णांना उपचारासाठी मदत करत होते.कोविड रुग्णांना औषधे,बेड,उपलब्ध करून देत आहे.नगर शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत असे उदगार कुंदन ऋषीजी म.सा यांनी केले.
        आनंदधाम येथील जैन साधु-साध्वी यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात आला यावेळी आ.अरुणकाका जगताप,आ. संग्राम जगताप,युवाचार्य महेंद्र ऋषीजी म.सा,आलोक ऋषीजी म.सा,जितेंद्र ऋषीजी म.सा,अचाल ऋषीजी म.सा,अक्षय ऋषिजी म.सा,अमृत ऋषीजी म.सा, नरेंद्र बाफना, संजय ताठेड,अनिल दुगड,संतोष बोथरा,ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बॅंकेचे संचालक संजय चोपडा, नगरसेवक विपुल शेटीया आदी उपस्थित होते.
      यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की,महाराष्ट्रला साधू संतांचा वारसा लाभलेला आहे.त्यांच्या विचाराने आज आपण सर्वजण चालत आहो,त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे आज आनंदधाम येथील साधु-साध्वीना  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ढोस देण्यास सुरुवात केली आहे असे ते म्हणाले.
     यावेळी बोलताना मा.नगरसेवक संजय चोपडा म्हणाले की, आनंधाम येथील साधु-साध्वीना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप व महापालिका प्रशासन यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर आ.संग्राम जगताप यांनी हा प्रश्न मार्गी लावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post