शिवसेना व मनसे एकत्र येणार? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया

शिवसेना व मनसे एकत्र येणार? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया 



मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांना मंगळवारी एका वेबिनारमध्ये हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला?, त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असं सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. यासोबतच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकतं, असं विधानही अरविंद सावंत यांनी केलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post