फडणवीसांचे विश्वासू राम शिंदे यांचे अजित पवारांशी गुफ्तगू, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


फडणवीसांचे विश्वासू राम शिंदे यांचे अजित पवारांशी गुफ्तगू, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणकर्जत - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे  भेट घेतली.  सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.  ही भेट कर्जत -जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यासाठी चुलते अजित पवार यांनी काही सोईस्कर मार्ग काढण्यासाठी की आणखी काही? राम शिंदे यांना खासदारकीची ऑफर? राम शिंदे ही महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मग त्यांचा काय निरोप घेऊन तर अजित पवारांना भेटले नाहीत ना ? अशा सर्व चर्चा राजकीय क्षेत्रात चालू आहेत .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post