जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

 जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या गलथान कारभाराने अनेक कर्मचारी करोनामुळे मयत झाल्याचा आरोप महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू विचार मंचच्यावतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मयत झालेल्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.

जिल्हा सहकारी बँक कारभार बेजबाबदारपणामुळे बँकेचे अनेक कर्मचारी मयत झाले आहेत. बँकेने कोणत्याही प्रकारची करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यामुळे करोनाचा संसर्ग होऊन कर्मचारी मयत झाले. जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखा सॅनिटाईझ करण्याचे आदेश देऊन देखील बिल कोण देणार? याबाबत स्पष्टता नसल्याने शाखेचे सॅनिटाईझ झाले नाही. तर कर्मचारी व ग्राहक वर्गाला सॅनिटायझर, मास्क अन्य प्रतिबंधात्मक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचे शासनाचे आदेश असताना 100 टक्के पूर्ण क्षमतेने सर्व कर्मचारी उपस्थित राहून काम करत होते.

कर्मचारी आजारी असेल तरी त्याला रजा दिली जात नव्हती. रजा शिल्लक नसेल तर पगार कपात केली जात होती. 2019-2020 वर्षातील पशुपालनाचे वाटप केलेले कर्ज परत जमा करून घेऊन, ते मार्च 2021 नंतर परत वाटप करण्याचे आदेश बँकेचे चेअरमन यांनी दिले. त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली व कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला. करोना जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत गर्दीवर नियंत्रण नव्हते. जिल्हा बँकेने करोना मयत झालेल्या कर्मचार्‍यांना 50 लाखाचा विमा घोषित केला. मात्र जे कर्मचारी मयत झाले त्यांना 50 लाख विम्याची मदत देण्यात आलेली नाही. विमा काढल्याचा कोणताही पुरावा बँकेच्या कर्मचार्‍यांकडे नसल्याने त्यांना विम्याची खात्री नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post