तिसऱ्या लाटेचं सावट...नगर शेजारील 'या' जिल्ह्यात पर्यटनावर निर्बंध

 तिसऱ्या लाटेचं सावट, नगर शेजारील नाशिक जिल्ह्यात पर्यटनावर निर्बंधनाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती आणि पर्यटनस्थळावर होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सोमवारपासून जिल्ह्यातील मॉलही सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच कोंडी झाली आहे. 

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाऊस सुरू झाल्याने नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post