बारामती ॲग्रो तर्फे ऊर्जा उपक्रमांतर्गत एनर्जी ड्रिंक वाटप

 बारामती ॲग्रो तर्फे ऊर्जा उपक्रमांतर्गत एनर्जी ड्रिंक वाटपअहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यासह देशावर संकट आले त्यावेळेस एक सामाजिक दातृत्वाची भावना समजून मदती द्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा बारामती ऍग्रो लिमिटेड आहे.या महामारीत अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. तेव्हा त्यांच्या प्रती असणाऱ्या आरोग्यविषयक काळजी व सद भावनेतूनच बारामती ॲग्रो तर्फे सामाजिक बांधिलकीतून ऊर्जा उपक्रमा अंतर्गत जिल्हा रुग्णालय येथे 1 हजार एनर्जी ड्रिंक व जिल्हा परिषद मध्ये 5 हजार 800 तर अहमदनगर महानगरपालिका मध्ये 1 हजार 700 व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 3 हजार 900 एनर्जी ड्रिंक येथील कार्यरत कोरोनायोद्धा साठी ओ.आर.एस एनर्जी ड्रिंक देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, वैभव खेंगट, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, अशोक बाबर, किसनराव लोटके, फारुख रंगरेज, लहू कराळे, सुमित कुलकर्णी, कृष्णा सातपुते, रोहन साबळे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post