नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय सुरू काय बंद

 कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे व्यवहार शहरातील फळे भाजीपाला बाजार वगळून सुरळीत सुरू जागतीक संकटामुळे समितीचे दिनांक २५/०३/०२१ पासून कांदा लिलाव बंद होते तसेच दिनांक ०१/०४/२०२१ पासून भूसार बाजार, भाजीपाला, फळे, फले विभाग, कडबा विभागातील व्यवहार पूर्णपणे बंद होते. दरम्यानचे काळात नेप्ती उपबाजार येथे फळे भाजीपाला दिनांक ०१/०५/२०२१ पासून सुरू करण्याचे आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांचे कार्यालयाकडून भेटले व त्यानुसार फळे भाजीपाला नेप्ती येथे सुरू होता. तद्नंतर बाजार समितीचे मागणीस्तव मा. जिल्हाधिकारी यांनी दिनांक १/०६/२०२१ पासून फळे भाजीपाला व कांदा बाजार नेप्ती येथे सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत कोवीड नियमांचे पालन करुन सुरु करणेबाबत आदेश दिले व भुसार ( अन्न धान्य बाजार ) मुख्य आवार मार्केट यार्ड येथे सुरु करणेबाबत आदेश दिले. त्यास अनुसरुन बाजार समितीने दिनांक ०२/०६/२०२१ पासून भुसार बाजार मुख्य यार्ड येथे सुरु केला आहे. तसेच फळे भाजीपाला बाजार दिनांक ०१/०६/२०२१ पासून नेप्ती येथे पूर्वीच्या वेळेत सुरु आहे. तसेच कांदा लिलाव हे दिनांक ०३/०६ / २०२१ पासून सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत सुरु केले आहे. कांदा आवक लिलावाचे आदले दिवशी सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत समितीमध्ये उतरविली जाते. समितीने संबंधित बाजार सुरु राहणेसाठी निर्बंध घातले आहे, त्यामुळे एका गाडी सोबत एकाच शेतकन्याला यार्डवर येता येईल. तसेच यार्डवर येताना समिती गेटवर आर.ए. टी टेस्ट करुनच यार्डात प्रवेश दिला जाईल. आणि विना मास्क व कोवीड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्याचेही सचिव यांनी आदेश पारित केले आहे. दरम्यान भुसार बाजार येथे बाजार सुरु झालेपासून अन्नधान्याची ३९४ क्विंटल आवक झाली आहे व नेप्ती येथे गत दोन दिवसात फळे भाजीपाल्याची ५९२ क्विंटल आवक झाली आहे. तसेच दिनांक ०३/०६/२०२१ रोजी कांदा आवक १०८६८ क्विंटल असून बाजारभाव १ नंबर कांद्यास १८०० ते २१०० रुपये, २ नंबर कांद्यास १०५० ते १८०० रुपये, ३ नंबर कांद्यास ६०० ते १०५० रुपये, ४ नंबर कांद्यास ३०० ते ६०० रुपये असे प्रति क्विंटल दर मिळाले.


तरी सर्व घटकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करुनच बाजार समितीमध्ये प्रवेश करावा, व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे असे आवाहन समितीचे सभापती श्री. अभिलाष घिगे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post