मनपा प्रशासनात मोठी खळबळ...डॉ.अनिल बोरगेंचे मनपा आयुक्तांच्या आदेशाला 'आव्हान'


मनपात प्रशासनात मोठी खळबळ...डॉ.अनिल बोरगेंचे मनपा आयुक्तांच्या आदेशाला आव्हान 

बोरगे म्हणतात मी जबाबदारी पार पाडल्याने नगर शहरात रूग्ण संख्या घटली



नगर-  महापालिकेचे वैद्यकीय  अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना आजपासून आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसा आदेश आहे. परंतु या आदेशाला डॉ. बोरगे यांनी आज (दि. 9) त्यांच्या शैलीमध्ये उत्तर देत आव्हान दिले आहे. कोविड  काळात मला सोपविण्यात आलेले कामे मी पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आयुक्त गोरे यांनी काल (दि. 8) डॉ. बोरगे यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश काढला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. बोरगे यांनी आयुक्त गोरे यांच्या आदेशावर आज सकाळी सविस्तर म्हणणे मांडले आहे. डॉ. बोरगे यांनी म्हटले आहे, उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त  यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांना स्वतंत्र अधिकार प्रदान केले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे व त्या कर्तव्यामध्ये मला कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पूर्ण न केलेल्या बाबींसाठी मला जबाबदार धरणे योग्य ठरत नाही.

माझ्यावर ज्या काही जबाबदार्‍या देण्यात आलेल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आहेत. परिणामी नगर शहराची कोरोना रुग्ण संख्या ही कमी झाली आहे. राज्य सरकारच्या निकषानुसार नगर लेव्हल वनमध्ये असल्याने कोविडचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मला सोपविण्यात आलेले काम मी पूर्ण केलेले असल्याने मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही. माझी प्रकृती ठणठणीत आहे व वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍याच्या

जबाबदार्‍या कर्तव्य दक्षतेने पार पाडण्यासाठी मी तयार आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी महापालिकेच्या या कामी जबाबदार असणार्‍या सर्व अधिकार्‍यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता समान न्याय देऊन फक्त मला एकट्याला सक्तीच्या रजेवर पाठवू नये. मला माझी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेल्या इतर अधिकार्‍यांच्या नेमणुकीचे आदेश रद्द करावे, असे या पत्रात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post