कोविड लसीकरण किती काळ संरक्षण देते? WHO ने केला खुलासा

 

कोविड लसीकरण किती काळ संरक्षण देते? WHO ने केला खुलासाकोव्हिड-19 च्या जागतिक महामारीच्या संकटामध्ये सर्वच देशांचं प्राधान्य सध्या लसीकरणाला आहे. 

जगभरात विविध कंपन्यांच्या लशींना मान्यताही मिळाली आहे. पण अनेकदा या लशींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच WHOनं यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे

 त्यानुसार सध्या उपलब्ध असलेल्या लशी या प्रामुख्यानं कोरोनामुळं होणारे मृत्यू आणि उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यापासून बचाव करत आहेत.

लशींच्या सुरक्षिततेविषयी WHO ला विचारण्यात आलेला आणखी एक प्रश्न असाही होता की, या लशींमुळे किती काळापर्यंत संरक्षण प्राप्त होतं. मात्र याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर WHO कडून देण्यात आलं आहे.

सध्या जगभरात ज्या लशी उपलब्ध आहेत, त्या व्यक्तीला नेमक्या किती दिवसांपर्यंत कोव्हिड-19 पासून संरक्षण देऊ शकतात, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र पुढच्या वर्षभरामध्ये याबाबत नेमकी माहिती हाती येईल," असं WHO नं स्पष्ट केलं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post