'व्यंकटेश मल्टीस्टेट'मध्ये ऑनलाईन सातबारा सुविधा, चार जिल्ह्यांतील शाखेत उपलब्ध

 व्यंकटेश मल्टीस्टेट मध्ये ऑनलाइन सातबारा सुविधा नगर : शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर कर्ज वितरित करताना सुलभता  येण्यासाठी महसूल विभागाने बँकेसाठी संकेत स्थळ सुरु केले आहेत. या संकेत स्थळाची सेवा मिळवण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसा.लि. महसूल विभागासोबत समंजस करार केला आहे . त्यामुळे व्यंकटेश मल्टीस्टेट मधून सातबारा , खाते  उतारा , फेरफार ऑनलाईन पद्धतीने करून देण्यात येत आहे शासनाच्या महत्वकांक्षी सातबारा प्रकल्पाअंतर्गत जास्तीत-जास्त व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .

             व्यंकटेश मल्टीस्टेट नवीनधोरणानुसार शेतकरी हा साऱ्या जगाचा पोट भरणारा पोशिंदा असतो. त्याच्या कष्टयाचे मोल म्हणून त्याचा सन्मान करणे संस्थेचे आद्य कर्तव्य आहे म्हणून व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विविध शेती विषयक कर्ज पूर्ण करण्यासाठी या योजनेचा कायदा होऊ शकतो .

            राज्यात आजही सरकारी कामकाजात . बँकांमध्ये कर्ज प्रकरणे अथवा अन्याकामांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा फेरफार आवश्यक असतो . या करारामुळे बँकेत  सातबारा वेळेत मिळाल्याने चांगल्या योजनांपासून वंचित राहावे लागणार नाही. व शेतकऱ्यांना इत्यादी शासकीय कार्यालयात हेपते मारण्याची गरज राहणार नाही . व्यंकटेश मल्टीस्टेट ही  बँकिंग क्षेत्रात काम करणारी सांस्था  आहे. संस्थेचे एक लाखापेक्षा  अधिक सभासद आहेत.अ नगर ,औरंगाबाद ,जालना ,बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या एकूण २२ शाखांचे विस्तीर्ण जाळे पसरलेले आहे.नोटबंदी पासून संस्थेने डिजिटल बँकिंगचा वापर करून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत  सुविधा कशा पोहोचवता येतील याचा शोध घेतला.त्यामाध्यमातून   मोबाईल अँप , इंटरनेट बँकिंग ,आधार कार्ड वरती पैसे काढणे अशा विविध  सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आगामी काळामध्ये संस्थेने अधिक व्यापक स्वरूपात डिजिटल बँकिंग सुविधा  देण्याच्या हेतूने  फिरते UPI QR CODE  सुविधा सुरु केली  आहे .

2/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post