नगर-मनमाड महामार्गावर अपघात, पती पत्नी ठार, ९ वर्षांचा मुलगा बचावला


नगर-मनमाड महामार्गावर अपघात, पती पत्नी ठार, ९ वर्षांचा मुलगा बचावलानगर:  जळगाव जिल्ह्यातून पुण्याला निघालेल्या एका दाम्पत्याच्या कारला नगरजवळ विचित्र अपघात  झाला. यामध्ये ते दोघेही ठार झाले असून त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. चालकाचा ताबा सुटलेला कंटेनर कारवर आदळल्याने हा अपघात झाला असून यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

नगर- मनमाड महामार्गावर विळद घाटात रविवारी हा अपघात झाला. कारमधील रवींद्र किसन पाटील (वय ४५) व मनीषा रवींद्र पाटील (वय ४२ दोघही रा. पाचोरा जि. जळगाव) ठार झाले. त्यांचा मुलगा ऋषिकेश (वय ९) जखमी झाला आहे. कारमध्ये हे तिघेच होते.

अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झालेला आहे तर त्याचा साथीदार हा या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post