आंदोलन पुढे ढकलण्यासाठी संभाजी महाराजांनाही विनंती करणार

 आरक्षणासाठी  सरकारवर सामुहीक दबावाची गरज    -आ.विखे


आंदोलन पुढे ढकलण्यासाठी  संभाजी महाराजांनाही विनंती करणार  नासिक दि.७ प्रतिनिधी


 आरक्षणाच्या संदर्भात  समाजातील लोकप्रतिनिधीसह  आंदोलनकर्त्यां संघटना आणि  समाज बांधवांना एकत्रित आणण्यासाठी आपला प्रयत्न  असून,सामुदायिक नेतृत्वातूनच आरक्षणासाठी सरकारवर दबाव येवू शकतो.यासाठी संभाजी महाराजांनाही आंदोलन पुढे  ढकलण्याबाबत  विनंती  करणार असल्याची माहिती  भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यानी दिली.मराठा आरक्षणाच्या संदर्भात आ.विखे पाटील यांनी नासिक जिल्ह्य़ातील आंदोलनकर्त्यां संघटना आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधला.सिन्नर येथून आ.विखे पाटील यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौर्याला सुरूवात केली.नासिक येथे झालेल्या बैठकीस खा.भारती पवार, आ.सिमा आहेर आ.राहूल आहेर, जिल्हा अध्यक्ष केदा शहराचे अध्यक्ष गिरीश पालवे, चंद्रकांत बनकर,सुरेश भामरे,केशव आण्णा पाटील,जगन आण्णा पाटील,उध्दव निमसे,शिवाजी गांगुर्डे,नरेश पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.


नासिक येथील बैठकीनंतर आ.विखे यांनी पत्रकारांशी बोलताना यापुर्वीच मी सर्व संघटनाना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.त्याप्रमाणे याची पहीली बैठक लोणी येथे संपन्न झाली.पुढची बैठक समाजातील सर्व लोकप्रतिनिधी आणि संघटना यांची एकत्रितपणे घेण्याचा विचार आहे.वेगवेगळी आंदोलन झाली तर सरकारला आंदोलनकर्त्यामध्ये फूट पाडण्यांची संधी मिळते.हे होवू नये म्हणूनच  सर्वानीच सामुहीक नेतृत्वातून आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आ.विखे यांनी व्यक्त केली.


आरक्षण रद्द झाल्यानंतर  आघाडी सरकार मधील समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे होते पण ते घडले नाही उलट विसंगत विधान पहायला मिळाले.याबाबत सरकारची भूमिका समजायला तयार नाही.पण सध्यातरी इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.नासिक जिल्ह्य़ात  झालेल्या  बैठकांमध्ये  भूमिका विषद  करताना आ.विखे पाटील यानी सांगितले की,सर्वोच्च न्यायालयाने  मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.याबाबत समाज बांधवांमध्येच जावून यासंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही विखे म्हणाले.


     सप्रारंभी आ.विखे पाटील यांनी नासिक महानगर पालिकेस सदीच्छा भेट दिली.महापौर सतिष कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post