काॅंग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा....

 काॅंग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता : आ.विखेसंगमनेर :कोव्हीड संकटातील मृत्यूची खरी आकडेवारी बाहेर येवू देवू नका आशा सूचना राज्यात सर्व  जिल्ह्यांमधील  प्रशासनाला असाव्यात आशी शंका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली.मृत्यूची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न  सरकारने केला असल्याचा  आरोपही त्यांनी केला.


पत्रकारांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यातील आघाडी सरकारचे अपयश उघड झाले असून,पाच न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे  ज्यावेळेस ही याचिका आली तेव्हा यातील तीन न्यायाधीश हे आरक्षणाच्या विरोधात होते हे माहीत असून सुध्दा राज्य सरकारच्या वतीने कोणतीच भूमिका मांडली गेली नाही हे आश्चर्यकारक असल्याचे सांगतानाच विखे पाटील म्हणाले की,आरक्षणाच्या संदर्भात समाजातील भावना तीव्र आहेत.यासाठी एका व्यासपीठावर येवून सर्वाना सरकारवर दबाव आणावा लागेल.कारण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन झाली तर सरकारला फूट पाडण्याची संधी मिळते .हे होवू द्यायचे नसेल तर समाजाचा दबाव सरकावर एकत्रितपणे आणावा लागेल याचे नेतृत्व कोणीही करावे आशी भूमिका मांडतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काॅग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज होती असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post