चर्चा तर होणारच....खा.डॉ.सुजय विखे यांनी घेतली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट

 

चर्चा तर होणारच....खा.डॉ.सुजय विखे यांनी घेतली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेटनगर: राज्यात राजकारणात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वरुन चर्चा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌रंगल्या आहेत. त्यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. बुधवारी मुंबईत ही भेट झाल्याचे फोटो सोशल मिडियावर आले आहेत. या फोटोत जयंत पाटील हे विखेंना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र पुस्तक देताना पहायला मिळत आहेत. विखे-पाटील व राष्ट्रवादीचा सवतासुभा नेहमीच चर्चेत असतो. अशात खा. विखे-पाटील थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना भेटल्याने चर्चा तर होणारच. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जाते आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post