आ.राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवस, 'सिंधुताई आदिवासी निवारा' गृहप्रकल्पाचे लोकार्पण

आ.राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवस, सिंधुताई आदिवासी निवारा गृहप्रकल्पाचे लोकार्पणनगर: लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून जवळपास ६० कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्‍या माध्‍यमातून घरं मिळवून देण्यात आली. सिंधुताई आदिवासी निवारा या गृह प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या या घरांचा आज लोकार्पण सोहळा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झाला.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती होती.


त्याचबरोबर विखे पाटील यांनी वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने कोणत्‍याही कार्यक्रमाचे आयोजन न करता हार, बुके या खर्चाचा सर्व निधी पीएम केअर फंडासाठी द्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार धनादेश प्रांताधिकारी श्री. गोविंद शिंदे यांच्‍याकडे सुपूर्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post