धक्कादायक... पैशासाठी नराधम सासर्याकडून सुनेचा 80 हजारांत सौदा

 

धक्कादायक... पैशासाठी नराधम सासर्याकडून सुनेचा 80 हजारांत सौदालखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊत एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका नराधम सासऱ्याने आपल्या सूनेला चक्क 80 हजारात विकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने मुलाने योग्य पाऊल उचलल्याने मोठा अनर्थ टळला. 

संबंधित घटना ही लखनऊच्या बाराबंकी येथील मल्लापूर गावात घडली आहे. गावातील रहिवासी चंद्रराम वर्मा याचा मुलगा प्रिंसचं 2019 मध्ये आसामच्या एका मुलीशी लग्न झालं होतं. प्रिंसचा प्रेमविवाह झाला होता. प्रिंस लग्नानंतर आपल्या पत्नीसोबत गाझियाबादला राहण्यासाठी गेला. प्रिंसचा वडील चंद्रराम याने पैशांच्या लोभापाई आपल्या सूनेला विकण्याचा विचार केला. यासाठी त्याने मुलाकडे काहीतरी कारण सांगून सूनेला गाझियाबादेतून बोलावून घेतलं. त्याची सून 4 जूनला घरी आली. त्यानंतर सासऱ्याने रामू गौतम नावाच्या दलालासोबत कट आखला. रामू गौतम याने गुजरातचा तरुण साहिल आणि त्याच्या कुटुंबियांना बाराबंकी येथे बोलावलं. त्यानंतर दोघी पक्षांची चर्चा झाली. चर्चेअंती 80 हजारात सौदा झाला. आरोपी सासऱ्याने 80 हजारात सूनेला विकण्याचा सौदा केला.सुदैवाने चंद्ररामच्या घाणेरड्या कटाची माहिती अखेर प्रिंसला मिळाली. प्रिंसच्या पाहुण्याने त्याला याबाबत कल्पना दिली. तो तातडीने बाराबंकी येथे आला. तो घरी आला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे वडील चंद्रराम दोघी घरात नव्हते. त्याने वेळ न दडवता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने संबंधित प्रकरणाची पोलिसांना सविस्तर माहिती दिली.

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली.  आरोपी सासरा गुजरातमधून आलेल्या तरुणासोबत सूनेचं लग्न लावणार होता. विशेष म्हणजे संबंधित तरुण तिला गाझियाबादला घेऊन जाणार असल्याची खोटी माहिती देवून तो तिला रेल्वे स्टेशनला घेऊन आला होता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post