विवाहितेची आत्महत्या, तब्बल साडेतीन वर्षांनी पोलिसांनी केली कायदेशीर कारवाई


विवाहितेची आत्महत्या, तब्बल साडेतीन वर्षांनी गुन्हा दाखलनगर:  विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या लोकांना जबाबदार धरून तब्बल साडेतीन वर्षांनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी फिर्याद दिली आहे. सुनीता अमित पालवे (वय 32 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अमित पोपट पालवे, सासरा पोपट पालवे, सासू छाया पोपट पालवे, दीर अजित पोपट पालवे, अरविंद पोपट पालवे (सर्व रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 20 ऑगस्ट 2017 मध्ये सुनीता पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरी बेडरूमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सुनीता यांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या आई- वडील किंवा इतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात कोणाविरोधात तक्रार दिली नव्हती. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान सुनीता मयत झाल्यानंतर तिच्या कमरेला एक चिठ्ठी मिळून आली होती. या चिठ्ठीच्या आधारे तब्बल साडेतीन वर्षांनी त्याचे अवलोकन करून पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post