अनलॉक नंतर करोनाचा धोका...राज्यात रूग्णसंख्या वाढली

 अनलॉक नंतर करोनाचा धोका...राज्यात रूग्णसंख्या वाढलीमुंबई: करोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post