10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याबाबतचे क्रीडा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ

 

*2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याबाबतचे क्रीडा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ*
नगर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12) परिक्षेचे आयोजन अनुक्रमे दि.29 एप्रिल ते दि.20 मे 2021 व दि.23 एप्रिल ते दि.21 मे 2021 या कालावधीत करण्यात आलेले होते.परंतु शासन निर्णयाने या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत . खेळाडूचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने सवलत गुणांची सुविधा पात्र खेळाडूंना  दिलेली आहे .

      परंतु या परिक्षेसाठी कोविड-19 या रोगाच्या प्रादूभार्वामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.28 मे 2021 च्या पत्रान्वये सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ. 8वी व इ.9 वी मध्ये या विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन विद्यार्थ्यांस सन 2020-21 करीता गुण देण्यात यावेत, तसेच सन 2020-21 या वर्षात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.12 वी व पूर्वी इ.11 वी मधील विद्यार्थ्याचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व विद्यार्थ्यास सन 2020-21 करीता गुण देण्यात यावेत, ही सवलत केवळ सन 2020-21 च्या परिक्षांकरीताच देय राहील, असा निर्णय घेण्यात आला होता.

     त्यानुसार सन 2020-21 या वर्षात इ.10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याबाबतचे क्रीडा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे प्रस्ताव विहीत नमुन्यात शनिवार दि.12 जून, 2021 ते सोमवार दि.21 जून,2021, तर  संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव व यादी मंगळवार दि.15 जून, 2021 ते शुक्रवार दि.25 जून,2021 रोजी सादर करणे आवश्यक  आहे.

      तरी याबाबत सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी

*जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post