भाजप नगरसेविका संतापली, मुख्याधिकार्यांना म्हणाल्या 'गळा चिरून टाकेन'

 भाजप नगरसेविका संतापली, मुख्याधिकार्यांना म्हणाल्या 'गळा चिरून टाकेन'सातारा : सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरुन राडा सुरु आहे. यावरुन सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन, अशा धमकीचीऑडिओ क्लिप साताऱ्यात चांगलीच व्हायरल झाली आहे. 

या क्लिपबाबत भाजप नगरसेविका आणि पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार म्हणाल्या, “एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागते. मला संताप अनावर झाला असून, लोकांच्या झालेल्या भावनाविवेशामुळे मला बोललेल्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही”.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post