भाजपला बंगालमध्ये मोठा धक्का... राष्ट्रीय उपाध्यक्षांची तृणमूलमध्ये घरवापसी

भाजपला धक्का... राष्ट्रीय उपाध्यक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल कोलकाता : बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा झटका लागला आहे. राज्यातील भाजपचे मोठे नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी भाजपचा साथ सोडली आहे. त्यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्यांचं स्वागत केलं. मुकुल रॉय  यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी आमदार शुभ्रांशु रॉय  देखील तृणमूलमध्ये सामील झाले आहेत.


निवडणूक निकालानंतर मुकुल रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. काही दिवसांपासून ते भाजपपासून लांबच होते. मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचे खास मानले जायचे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post