जिल्ह्यात सक्रीय रुग्ण घटले...बरे होणारे जास्त

 *दिनांक १० जून, २०२१*


*आज ११७१ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ८६८ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९१ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज ११७१ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत  ८६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ५५४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६४ आणि अँटीजेन चाचणीत ३०१ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १०, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०४, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ११, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०९, राहता ०३, राहुरी ०४, संगमनेर २०, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०६, जामखेड ०२, कर्जत १६, कोपरगाव ३४, नगर ग्रा.१६,  नेवासा ७०,  पारनेर ३८, पाथर्डी ६८, राहाता ०८,  राहुरी २२, संगमनेर १५, शेवगाव ६५, श्रीगोंदा ५६, श्रीरामपूर २१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ३०१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०९, अकोले ५२,  जामखेड ०७, कर्जत १७, कोपरगाव ३१, नगर ग्रा. १६, नेवासा ४०, पारनेर ३२, पाथर्डी १८,  राहाता ११, राहुरी १०, संगमनेर २०, शेवगाव ११, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५१, अकोले ९५, जामखेड १२५, कर्जत ५६,  कोपरगाव ६०, नगर ग्रामीण ९५, नेवासा ७४, पारनेर ११२, पाथर्डी ८३, राहाता १३, राहुरी ५०, संगमनेर ११२,  शेवगाव ८८,  श्रीगोंदा ९७,  श्रीरामपूर ४२, कॅन्टोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२, इतर जिल्हा १२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:२,६२,०८१*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:४५५४*


*मृत्यू:३७९५*


*एकूण रूग्ण संख्या:२,७०,४३०*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा* 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post