भाजप शिवसेनेला डिवचणार,नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद?

मोठी घडामोड... नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपदाची चर्चामुंबई:  भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली घडत असताना नारायण राणेंची दिल्लीवारी महत्वाची मानली जात आहे. 

नारायण राणे हे दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे हे एका महिन्यापूर्वी दिल्लीला जाऊन आले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी त्यांना ठाम खात्री असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते स्वत:हून दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल  असा ठाम विश्वास राणेंना असल्याचं सांगितलं जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post