कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू


कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.


आता आग आटोक्यात आली असून कुलिंग आणि कर्मचाऱ्यांच सर्च ऑपरेशन सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली  कंपनीत क्लोरीन क्लोराईड बनवण्याचे काम करण्यात येत होते. क्लोरीन क्लोराईड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्लोरीन क्लोराईडचे बॉक्स असल्यानं आग धूमसत गेली आहे. आगीत आतापर्यंत 18 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून पीएम आरडीए अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आगीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे.  कंपनी मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी  ताब्यात घेतलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post