'महसूल'मध्ये खळबळ...'आर्थिक' व्यवहाराच्या तक्रारींमुळे प्रांताधिकारी निलंबित

 महसूलमध्ये खळबळ...आर्थिक व्यवहाराच्या तक्रारींमुळे प्रांताधिकारी निलंबितसोलापूर:  आर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केलं आहे. शासनाच्या या कारवाईनंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.

प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे केल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भातील एक ध्वनीफितही सादर करण्यात आली होती. या ध्वनीफितीतील आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे ठरवलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post