२० हजारांची लाच, पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

 

२० हजारांची लाच, पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यातनगर- लोणी पोलीस ठाण्यात नेमणूक असलेला मात्र संलग्न असलेल्या शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेला भाऊसाहेब संपत सानप याने कोळपेवाडी येथील वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादीकडून पंचासमक्ष 30 हजारांची लाच मागितले. तडजोडीअंती 20 हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत विभाग नाशिक यांच्याकडून सापळा लावून भाऊसाहेब संपत सानप याला अटक केली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळपेवाडी येथे फिर्यादी याचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. दि. 27 मे रोजी फिर्यादीचे वाहन पोलिसांनी पकडले होते. ते सोडून देण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील संबंधित पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याने फिर्यादीकडे दि. 27 मे रोजी 08 वाजेच्या सुमारास 30 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीपोटी 20 हजार रुपये ठरले. ही रक्कम लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांच्या समक्ष व पंचासमक्ष फिर्यादीकडे मागताना त्याचा पुरावा तयार केला. त्या प्रकरणी त्याच्या विरोधात सोमवारी लाचलुचपत विभागाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पो.हवा. पळशीकर, पोना. प्रवीण महाजन, पो.ना. गरुड. चापोशी, श्री.जाधव. आदींनी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप अधीक्षक विजय जाधव, ला.प्र.वि, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post