गॅस कटरने एटीएम कापून पावणे सहा लाख रुपये लंपास

गॅस कटरने एटीएम कापून पावणे सहा लाख रुपये लंपास नगर: कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील इंडिया वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीन चोरांनी फोडून साडेपाच लाख रुपये चोरून नेले.

स्वप्निल नंदकुमार तरटे रा.उंदिरगाव ता.श्रीरामपूर याने शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मी इंडिया वन प्रायव्हेट लिमीटेड कंपनीमध्ये दोन वर्षापासून नोकरी करतो. माझ्याकडे कंपनीचे एटीएम मशीनचे देखभाल करण्याचे काम आहे. दि.4 जून 2021 रोजी दुपारी 2 वा. पोहेगाव येथील एटीएम आमच्या कंपनीचे कॅश लोडिंगचे काम करणारे राहुल राठोड यांनी एटीएममध्ये पाच लाख रुपये भरले होते.

बँकेचे एटीएम मध्ये सर्व रक्कम मिळून एकूण 5 लाख 79 हजार 500 रुपये शिल्लक होते. 5 जून रोजी पहाटे 5 वा. कंपनीचे झोनल मॅनेजर धर्मेंद्र वर्मा यांनी पोहेगाव येथील कंपनीचे एटीएममध्ये चोरी झाली असे फोनवरून कळविले. पोहेगाव येथे जाऊन एटीएमची पाहणी केली असता एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापलेले दिसत होते. तसेच एटीएममध्ये पैसे शिल्लक नव्हते. अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीचे एटीएम मशीन कापून आतील रक्कम 5 लाख 79 हजार 500 रुपये चोरून नेले. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post