पंतप्रधान व‌ मुख्यमंत्री यांची भेट... पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय?

 

पंतप्रधान व‌ मुख्यमंत्री यांची भेट... पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय? 

मनसेचा खोचक टोलामुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अजित पवार आणि अशोक चव्हाण  यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आता या चर्चेवरून विविध तर्क वितर्कांबरोबरच विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मनसेचे  नेते संदीप देशपांडे  यांनीही असाच चिमटा काढला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post